Sunday, September 24, 2006

MARATHI KAVITA

दोस्ती नाम नहीं सिर्फ़ दोस्तों के साथ रेहने का..
बल्कि दोस्त ही जिन्दगी बन जाते हैं, दोस्ती में..
जरुरत नहीं पडती, दोस्त की तस्वीर की....
देखो जो आईना तो दोस्त नज़र आते हैं, दोस्ती में....
येह तो बहाना है कि मिल नहीं पाये दोस्तों से आज....
दिल पे हाथ रखते ही एहसास उनके हो जाते हैं, दोस्ती में....
नाम की तो जरूरत हई नहीं पडती इस रिश्ते मे कभी....
पूछे नाम अपना ओर, दोस्तॊं का बताते हैं, दोस्ती में....
कौन केहता है कि दोस्त हो सकते हैं जुदा कभी....
दूर रेह्कर भी दोस्त, बिल्कुल करीब नज़र आते हैं, दोस्ती में....
सिर्फ़ भ्रम हे कि दोस्त होते ह अलग-अलग....
दर्द हो इनको ओर, आंसू उनके आते हैं , दोस्ती में.
================================================================

एखादाच असतो .....

नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो
हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो
मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो
चमकणारे कजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो
सुखचे सोबती सर्वच असतात
दुःखचा साथीदार एखादाच असतो
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो
जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो
===========================================
माझ्या समोर चंदनाचं झाड
पण माझ्यापाशी ना एवढंस खोड...
माझ्या शेजारी केवड्याचे बन
पण माझ्या नशिबा ना एकही पान...
माझ्या भोवताली गर्द हिरवाई
नि माथ्यावर माझ्या उन रणरणत येई...
माझ्या समोर गं सुखाच्या या राशी
नि आतून झुरणारी मी, कायमच उपाशी...

==============================================

वाटलेलं...

कधीतरी माझी प्राजक्ताची फुलं
तुझ्या ओंजळीला गंधित करतील
जीवनातल्या कुठल्यातरी वळणावर
माझे इंद्रधनुचे रंग तुला भावतील
माझ्या श्रावण धारांनी तू ओलाचिंब होशील
नि माझे ओले मेघ तुझ्या डोळ्यात दाटतील

पण आता कळतंय...
हे कधीच शक्य नाही..

कारण यासाठी लागणारं मन
तू कधीच कुणाकडं तरी आंदण ठेवलंयस...

=================================================
कोणाच्या गोष्टींनी कोणाचे डोळे

कसे पाणावती सांगता न ये

आभाळाचे दान स्वीकारावे लागे

स्वतःला अनुकूल मागता न ये



कोणा कुठल्याश्या जीवाचे अंतर

कुठल्या अंतरी कसे अंकुरावे

कोणाच्या दुःखाची सहसंवेदना

कोणास जागवी पाहता न ये

अंकुरास काय सुखे रुजवावे

हिरव्या जगाचे हिरवे बीज

कोठल्या मातीत कोण जीव रुजे

बीजाला स्वतःच जाणता न ये

कोण कुणासवे कुठे कसे भेटे

कुणाची कुणाला वाटेवर साथ

कुणाचे नशीब कुणा कसे जुळे

ललाटीचा लेख वाचता न ये...........
=================================================
तुझ्या असण्यामुळं
जगणं थोडं सुसह्य झालंय
तुझ्यामुळं मला हक्काचं
विसाव्याचं स्थान मिळालंय...

माहित आहे मला...

वादळ थोपवायला
तूही असमर्थ आहेस नि मी ही
पण वादळं झेलण्याचं नि पेलण्याचं
तुझ्यामुळंच मला सामर्थ्य मिळालंय...

माहित आहे मला...

या भरकटलेल्या गलबताला
तू दिशा नाही दाखवू शकत
पण नांगर टाकून स्थिर होण्यासाठी
तुझ्यारुपी एक बेट मिळालंय...

माहित आहे मला...

घाव घालणारे घाव घालतच जाणार
तुकडे तुकडे होतच राहणार
घातलेले टाके उसवतच राहणार
धबधब्यासारखं जन्मभर कोसळतच राहणार...

पण यातून सावरण्यासाठी
मला तुझं दान मिळालंय
तुझ्या असण्यामुळं
जगणं थोडं सुसह्य झालंय...

=============================================
माझं आभाळ दररोज भरुन आलेल असतं...

पाऊस रिमझिमतो, पण आभाळ कधीच मोकळं होत नाही...

=============================================