Tuesday, May 15, 2007

प्रिये तुझ्याविना

प्रिये तुझ्याविना
नाही आयुष्याला अर्थ काही
ग सजणे तुझ्याविना,
नाही शक्य ग माझे जगणे
आता प्रिये तुझ्याविना.

माझे सारे काव्य वाटु लागते
सुनेसुने तुझ्या गोड आठवणींविना,
नाही सरत दिवस माझा
तुझा आवाज ऐकल्याविना.

कशी होतील ग सखे
स्वप्ने माझी तुझ्याविना
कोण देणार ग साथ माझी
सुखः दुःखात फक्त तुझ्याविना

विचार माझे थांबतात
मन माझे भरुन येते,
वरुन जरी शांत दिसलो तरी
मनात दडलेले एक वादळ असते,
आठवणी मनात दाटुन आल्या
की प्रेम डोळ्यांतुन अश्रु बनुन वाहु लागते,

आणी मग,


वेडे मन माझं त्या वेड्या आठवणींवर काव्य बनवु लागते................................

No comments: